विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सागर अशोकराव जाधव, तर स्वीकृत संचालकपदी पोपटराव शंकरराव बुरुंगले यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सागर जाधव व पोपटराव बुरुंगले यांची नावे जाहीर केली. त्यास सर्व संचालकांनी एकमताने पाठींबा दिला.
माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे यांचा कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सागर जाधव यांची निवड करण्यात आली. स्वीकृत संचालक गुलाबराव देवकाते यांचा देखील कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी पोपटराव बुरुंगले यांची निवड करण्यात आली.
या निवडीबाबत सागर जाधव व पोपटराव बुरुंगले यांनी अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करू व संचालक मंडळाच्या सहकार्याने माळेगाव कारखान्याच्या आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या हिताच्या दृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले.