घनश्याम केळकर- महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यात पुरुषांसाठी अनेक ( जिम ) व्यायाम शाळेसाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याच धर्तीवर शलाका कोंडे यांनी पाच लाखाचे जिम साहित्य निधी उपलब्ध करून केळवडेमध्ये महिलांसाठी जिम उभारली असून तालुक्यातील पहिलीच व्यायाम शाळा ठरली असल्याची माहिती ग्रामसेवक अभय निकम यांनी दिली.
अमृत महोत्सव व स्वातंत्र्यदिनी केळवडे ( ता. भोर ) येथे जिल्हा परिषेदेच्या माजी सदस्या शलाका कोंडे यांच्या संकल्पनेतून पाच लाखाचे निधीतून महिलांसाठी व्यायाम शाळेचे (जिम ) उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी राजगड कारखान्याचे संचालक शिवनाना कोंडे, बाळकृष्ण दळवी, बाळासाहेब जायगुडे, सरपंच मनीषा सोनवणे, उपसरपंच आकाश कोंडे, ग्रामसेवक अभय निकम, ग्रा. सदस्य पांडुरंग कोंडे, मंजुश्री कोंडे, सुरेखा कोंडे, विश्वास मदने, प्रमिला कुंभार, माजी उपसरपंच नारायण कोंडे उपस्थित होते.
शलाका कोंडे यांनी बोलताना सांगितले की, शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात यापूर्वी स्पष्ट झाले आहे. धकाधकीच्या जीवनात आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी महिला आणि तरुणींनी व्यायाम शाळेचा उपयोग करावा असे आवाहन कोंडे यांनी केले.