खंडाळा : महान्यूज लाईव्ह
शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले.
शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ ऑगस्ट रोजी महेश गायकवाड यांच्या मालकीची मारुती सुझुकी कंपनीचे इको मॉडेलची गाडी चोरी झाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी शिरवळच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजकुमार भुजबळ यांना यासंदर्भात सूचना दिल्या.
त्यावरून भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे ही गाडी हडपसर येथे उभी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फौजदार सतीश आंदेलवार, नितीन महांगरे, प्रशांत वाघमारे, मंगेश मोझर यांनी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार डेरे, क्षीरसागर, रेजीतवाड यांच्या मदतीने दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, फौजदार सतीश आंदेलवार, सचीन वीर यांच्या पथकाने केली.