बारामती : महान्यूज लाईव्ह
आज म्हणजे १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तुम्ही अगदी शेतात असाल… कामात असाल… रस्त्याच्या कडेला असाल किंवा गप्पा मारत असाल… तुम्ही जागीच थांबा.. कारण त्याच वेळी संपूर्ण राज्य जैसे थे थांबणार आहे.. आपले राष्ट्रगीत वाजणार आहे..!
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यात व देशात वर्षभर विविध उपक्रम होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात स्वराज्य महोत्सव होणार आहे, यांतर्गत १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे.
एकाच वेळी राज्यात अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी तर ते बंधनकारक आहेच, मात्र सर्व ठिकाणच्या नागरिकांनीही यात भाग घेणे अपेक्षित आहे. सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरवात होईव व पुढील एक मिनीटात राष्ट्रगीत गायन होणार आहे.