विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
वाघळवाडी गावामध्ये स्वतंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने प्राथमिक शाळा वाघळवाडी या ठिकाणाहून तिरंगा हातामध्ये घेऊन तिरंगा सन्मान प्रभात फेरीला सुरुवात झाली. ग्रामपंचायत कार्यालय, विविध सेवा सोसायटी व गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
तिरंगा प्रभात फेरीमध्ये शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प प्राथमिक शाळा वाघळवाडी या ठिकाणी देशाची सेवा बजावत असणारे सैनिक श्री.सोमनाथ शिराळे, सैनिक श्री.अजित यादव, सैनिक श्री.किरण सावंत, सैनिक श्री.प्रवीण सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच सौ. नंदाताई सकुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी उपसरपंच श्री जितेंद्र सकुंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच यांच्या वतीने भारतीय अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. तसेच जि.प.प्राथमिक शाळा सोमेश्वरनगर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य चेतन गायकवाड श्री. गणेश जाधव, कन्नड वस्ती अंगणवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य श्री. दीपक दणाणे व तट्याची चाळ अंगणवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य श्री पांडुरंग भोसले या सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत वाघळवाडीच्या वतीने उपस्थित सैनिक व माजी सैनिक श्री बाबासाहेब जाधव व श्री गोरख मांढरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक सौ.आशालाता जाधव मॅडम व त्यांचा शिक्षक वर्ग यांना राष्ट्रगीत गायन मध्ये बारामतीमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल, झी मराठी डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमांमध्ये वाघळवाडीतील कलाकार कार्तिक लोखंडे यांना संधी मिळाल्याबद्दल डान्स शिक्षक श्री योगेश ननवरे व कार्तिक लोखंडे यांचे वडील श्री गौतम लोखंडे या सर्वांचा सत्कार वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
ग्रामपंचायत वाघळवाडी व सुमोटो कंपनी यांच्यातर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खाऊचे वाटप, विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले. व उपस्थित नागरिकांना चहा, अल्पोहार देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुमोटो कंपनीचे अधिकारी श्री केशव सिंग, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष श्री. सतीश सकुंडे, वाघळवाडी विविध कार्यकारीसेवा सोसायटीचे चेअरमन श्री संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री. हेमंत गायकवाड, बारामती तालुका युवा मोर्चा भाजपा उपाध्यक्ष श्री चेतनकुमार सकुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते श्री तुषार सकुंडे, ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड, गावातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,आजी-माजी सरपंच, उपसरपंच,चेअरमन,सदस्य पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला, युवक,नागरिक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी ध्वजारोहणासाठी उपस्थित होते.