संदीप मापारी पाटील, बुलढाणा
शिवसेनेमुळे ज्यांना ओळख निर्माण झाली तेच आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे बुलडाणा जिल्ह्यसंपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांनी केले.
लोणी रोडवरील विश्वनाथ मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रा. खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्ह्यातील दोन आमदार , खासदार आणि एक माजी आमदाराने शिवसेनेसोबत बंडखोरी केली, ते शिंदे गटात सहभागी झाले. भविष्यात धनुष्यबाण निशाणीही उद्धव गटाच्या शिवसेनेला मिळणार आहे. मात्र त्यांची गद्दारी सामान्य जनतेलाही पटलेली नाही. महाराष्ट्राची ही स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवेल.
शिवसेनेतून बंडखोरी करून गेलेल्यांना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही, लोणार शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही. तीनशे सत्तर कोटीचा निधी लोणार शहराला मिळाला. तो उद्धवसाहेबांनी लोणारला भेट देऊन गेल्यानंतर आराखडा तयार केल्यानंतर मंजूर केला होता. मात्र दुर्भाग्य असे की, ते यांच्या काळामध्ये आले. जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिवसेनेतून बंड करून बाहेर पडले.
आता परत शिवसेनेला जोमाने पुढे नेण्याचे काम यापुढे जोमात केले जाईल. निसर्गाचा नियमच आहे की, झाडाची जुनी पालवी गळून जाते आणि नवीन पालवी फुटते आणि झाड भरभरून मोठे होते. तसेच शिवसेना जोमाने पुढे जाणार आहे. भविष्यामध्ये आपण जनतेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहावे. बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्यांना परत निवडून येणे शक्य होणार नाही.
दरम्यान शिवसेनेला पुन्हा एकदा सावरण्याचे काम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, जिल्हाध्यक्ष दत्ता पाटिल, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, वसंत भोजने, माजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते आशिष रहाटे, छगनराव मेहेत्रे यांच्या नेतृत्वात सुरु झाले आहे.
मेहकरनंतर आज लोणार येथेही शिवसेने कडून निष्ठावान शिवसैनिक कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. यावेळी आशिष रहाटे म्हणाले की सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे ४० वर्ष ज्यांनी सत्तेचे सुख भोगले. त्यांनी आज पक्षाविरुद्ध भूमिका घेऊन शिवसेनेला अडचणीत आनण्याचे काम केले आहे. ते निष्ठावान शिवसैनिक येणाऱ्या काळात बंडखोरांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेने ८० च्या दशकात सामान्य कार्यकर्त्याना आमदार- खासदार केले. आज तीच परिस्थिती पुन्हा आली आहे. मात्र त्यामुळेच सामान्य कार्यकर्त्याना पुन्हा एकदा संधी निर्माण झाली असल्याचे आशिष रहाटे यांनी यावेळी संगीतले.
यावेळी दत्ता पाटिल, वसंतराव भोजने, छगनराव मेहेत्रे, यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत बंडखोरांवर टिका केली. यावेळी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन संदीप मापारी पाटील यांनी केले. असलम खान, श्याम राऊत, शिवसेना महिला आघाडीच्या अरुणा राठोड, गजानन जाधव, पंकज मापारी, सूदन अंभोरे, राहुल मापारी, देवा सावंत, गणेश शिंपी, बाळू सरदार, तुळशीदास पसरटे, सूर्या इरतकर, शेषराव पवार, अनिल पवार, कैलास अंभोरे, किसन मोरे यांनी या मेळाव्यासाठी योगदान दिले.
दरम्यान शेकडो नवतरुण कार्यकर्त्यांसह लोणार शहरातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पंकज मापारी पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून संपर्क प्रमुख प्रा. नरेंद खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, संदीप मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबंधन बांधले.