अनिल गवळी. महान्यूज लाईव्ह
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
निवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी ध्वजारोहण केले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रा.संदीप भोसले, नवल घुले पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विजय जाधव, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत ससाणे, वानवडी गाव देवस्थान ट्रस्टचे सरपंच दत्तात्रय जांभूळकर, ॲड.अनिल तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
ॲड.प्रशांत यादव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारत एक उद्यान असून वृक्षाप्रमाणेच सर्वांनी समानतेची वागणूक दिली पाहिजे असे सांगितले. समाजात द्वेष भावना पसरवणे चुकीचे असून सर्व महापुरुषांना एकाच रांगेत ठेवू नका. देशासाठी सर्वांनी त्याग करणे गरजेचे आहे. निर्व्यसनी रहा. भरपूर शिका, खूप कष्ट करा व स्वतःच्या परिवाराबरोबरच समाजाचे ही कल्याण करा असा सल्ला त्यांनी यावेली दिला.
माजी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी आपल्या देशासाठी समर्पण केलेल्या महान लोकांची कार्ये, सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील कार्याची आठवण करून दिली. “जय जवान, जय किसान” हा मंत्र आपण विसरून चालणार नाही. व्यवसायाबरोबर सामाजिक जाणीव ठेवलेल्या व्यक्तींचे स्मरण ठेवा असे सांगितले.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी धार्मिक सणापेक्षा राष्ट्रीय सण अधिक उत्साहाने व कर्तव्य भावनेने साजरे करावेत. असे केल्यानेच सक्षम भारत निर्माण होईल व कोणाचीही भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होणार नाही, असे सांगितले. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एकाच कुटुंबातील तीन पिढ्या देशासाठी शहिद झालेला प्रसंग गोष्टीतून विद्यार्थ्यांसमोर मांडला.
ॲड. अनिल तांबे यांनी इयत्ता 10 वी , 12 वी तील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी असेच सुयश संपादन करत रहावे असे सांगून त्याकरिता आवश्यक मदतीसाठी नेहमी तत्पर असू असे सांगितले.
याप्रसंगी प्रा. संदिप भोसले यांनी सीमेवरील सैनिक, मातीत राबणारा शेतकरी प्रामाणिकपणे काम करतो. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे, तर आपला देश महासत्ता होवू शकतो असे सांगितले.
यावेळी विद्यालयातील इयत्ता 10 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने व हितचिंतकांनी रोख रक्कमेची बक्षिसे दिली. जवळ जवळ 1 लाख रुपयापर्यंतच्या बक्षिसांचे वितरण यावेळी झाले. तसेच ॲड. अनिल तांबे व प्रा.नामदेव नवले यांच्या वतीने विद्यालयातील हुशार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच संजय ससाणे यांनी पुस्तकांचा संच भेट दिला. याप्रसंगी गौतम रासकर व शरद रासकर यांनी खाऊवाटप केले.
याप्रसंगी माजी नगरसेविका कविता शिवरकर, सुमन फुले, तसेच भुवनेश्वरी देसाई, जयश्री नरके, सोनाली परदेशी, दीपा जांभूळकर, सुदाम जांभूळकर, मोटार वाहतूक निरीक्षक विजय सावंत, दीपक केदारी, अनंता वीर, रमेश काकडे, सिद्धार्थ परदेशी, सिद्धांश परदेशी, चंद्रकांत तोंडारे, प्रल्हाद रासकर, तुकाराम कदम, बाळासाहेब हिंगणे, ॲड. विजय राऊत, हनुमंत रासकर, विनोद लोट, तुकाराम जांभूळकर, विशाल ओव्हाळ,शरद रासकर, सोपान गवळी, हसन कुरेशी, गिरमे, प्रविण जाधव, दशरथ जाधव, प्राचार्य लहू वाघुले यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी भैरवनाथ मंदिराचे पुजारी कै. शामराव जांभूळकर व शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार कै. विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले यांनी केले. सूत्रसंचालन दीपा व्यवहारे व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी केले.