सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये क्रीडा विकास अनुदानातून तीन लाख रुपयांचे क्रीडा साहित्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्रथम आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले. भरणे यांनी स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन केले. तसेच सर्वधर्मसमभावाने सर्वांनी एकमेकांस सहाय्य करून एकोप्याचा संदेश दिला पाहिजे असे उद्गार काढले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे धनंजय बाब्रस, विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस, इंद्रजित धुमाळ, डॉ. राजेश जाधव, ॲड. आशुतोष भोसले, सौरभ शिंदे, दादा सोनवणे, सुनील अरगडे, डॉ. रियाज पठाण, मुख्याध्यापिका भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे संदीप भंडलकर, निसार शेख आदी उपस्थित होते.