प्रदीप जगदाळे – महान्यूज लाईव्ह
बारामती – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामतीतील सायकल क्लबने एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सहकार्याने ७५ किलोमीटरची सायकल रॅली आयोजित केली. यामध्ये शेकडो सायकलस्वारांनी भाग घेऊन ही रॅली यशस्वी केली. या रॅलीत श्रीपूर सायकल क्लब, फलटण सायकल असोसिएशन, भिगवण सायकल क्लब यांच्या सदस्यांनीही सहभाग घेतला.
या रॅलीस फलटण रस्त्यावरील अधिराज लॉन्स येथे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. दिव्यांग सायकलपटू यश नवगिरे हा देखील यावेळी विशेष उपस्थित होता.
यानंतर बारामतीतून सुरूवात होऊन रॅली मोरगाव पासून तीन किलोमीटर अंतरावरून माघारी बारामतीकडे येऊन ७५ किलोमीटर अंतर पूर्ण केले. यशस्वीरित्या रॅली पूर्ण केलेल्या सदस्यांना पदक, प्रमाणपत्र देण्यात आले.