दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरातील एका महिलेकडून ओळख निर्माण करून हात उसने पाच हजार रुपये घेतले आणि ते परत देण्याच्या बहाण्याने रात्री घरी येऊन दोघांनी महिलेवर अत्याचार केला तसेच जर कोणाला काय सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करू आणि जीव मारू अशी धमकी दिली. या प्रकरणी कर्जत तालुक्यातील दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती दौंड पोलिसांनी दिली. किशोर सुद्रिक व दादा शेलार (पुर्ण नाव माहित नाही , दोघे रा बारडगाव सुद्रिक ता कर्जत जि अहमदनगर ) असे या नराधमांची नावे आहेत. ११ मार्च २०२१ रोजी १०.४५ वाजण्याच्या सुमारास ते रात्री २. पर्यंत ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडित महिलाही कुरकुंभ येथे एकटीच राहते. १६ मे २०१९ रोजी आरोपी किशोर सुद्रिक याची या महिलेच्या दुकानातून काही साहित्य घेण्याच्या निमित्ताने ओळख झाली. त्यानंतर तो वारंवार पिडित महिलेकडून धार्मिक साहित्य घेत असल्याने त्यांची ओळख वाढली. त्याने या महिलेकडे पाच हजार रुपये उसने मागितले. ते उसने पैसे परत देण्याची मागणी करीत पिडित महिलाही त्याला वारंवार फोन करून पैसे मागत होती.
तो मात्र आज, उद्या करत पैसे देणास टाळाटाळ करीत होता. ११ मार्च २०२१ रोजी उसने घेतलेले पैसे परत देण्याचे बहाण्याने तो मित्रासोबत घरी आला आणि एकटी महिला घरी असल्याचा गैरफायदा घेऊन या दोघांनी जीवे मारण्याची धमकी देत रात्री दोन वाजेपर्यंत या महिलेवर अत्याचार केला.
तू जर बाहेर कोणाला काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करून इज्जत घालवू तसेच जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडित महिलेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यांनतर किशोर सुद्रिक हा पिडीत महिलेला वेगवेगळ्या नंबर वरून वारंवार फोन करून धमकी देत होता. अशी फिर्याद पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.