भवानीनगर महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी (काझड) ते भवानीनगर पर्यंतचा पाच किलोमीटर रस्त्यापैकी दीड किलोमीटरचा रस्ता खराब होता. तो ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून पूर्ण केला. साधारणपणे सव्वा तीन लाख रुपये खर्च करून हा रस्ता ये-जा करण्यालायक ग्रामस्थानी बनवला.
या पाच किलोमीटर रस्त्यामधून दीड किलोमीटर रस्ता बरेच दिवस अपूर्ण होता. त्या रस्त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना व ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता.
या त्रासाला कंटाळून लोकांनी वर्गणी जमा केली व अंदाजे ३ लाख 25 हजार रुपये खर्च करून रस्ता तयार केला. गावचे सरपंच सावता बोराटे, माजी सरपंच पांडुरंग झगडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र झगडे, गावचे कार्यकर्ते आकाश झगडे, विजय झगडे, स्वप्निल झगडे, गणेश शिंदे, सचिन झगडे, शहाजी झगडे, संदीप नरुटे, विलास झगडे, महेश झगडे, अमोल झगडे, हनुमंत झगडे, रवींद्र म्हेत्रे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीमधून रस्त्याचे काम पूर्ण केले.