सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
आज संध्याकाळी सहा वाजता वीर धरणाचे सात दरवाजे चार फूटांनी उचलले असून निरा नदीत तब्बल ३२ हजार ६५९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. निराकाठी सावधानतेचा इशारा दिला असून निरा दुथडी भरून वाहणार आहे.
आतापर्यंत निरा नदीतून २४ हजार ३८५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यातच वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातून ९०० क्युसेक्स व डाव्या कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ३२ हजार ४५९ क्युसेक्सवर तो वाढविण्यात आला.
त्यामुळे सध्या निरा नदीतून ३३ हजार ६ ५९ क्युसेक्स एवढा पाण्याचा प्रवाह सुरू असून नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी. पावसाच्या प्रमाणावर या विसर्गात बदल होऊ शकतो असे जलसंपदा खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.