सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर येथील कुरेशी व बेपारी समाजाच्या अध्यक्षपदी शाबिरभाई बेपारी आणि उपाध्यक्षपदी रज्जाकभाई बेपारी यांची निवड झाली. त्याबद्दल भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी यापुढे समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले. यावेळी अख्तर कुरेशी, ललेंद्र शिंदे, सागर गानबोटे व मान्यवर उपस्थित होते.