विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती :
बारामतीत डॉ. प्रविण गायकवाड यांच्या स्पेशालिटी डायग्नोस्टिक्समधील सायमेन्स व्हेरीओ थ्री टी एमआरआय या नवीन अत्याधुनिक मशिनचे उद्धघाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे
अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राजवर्धन शिंदे,शिवाजीराव कदम माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, राजीव देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींची जबाबदारी वाढत आहे. डॉक्टरांनी मानवतावादी दृष्टिकोनातून सेवा केली पाहिजे. सेवाभावी वृत्तीला गालबोट लागू नये, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. असे सांगून डॉ. गायकवाड यांचे कोरोना काळातील योगदान विसरता येणार नाही असे अजित पवार म्हणाले.
प्रास्ताविक डॉ.प्रवीण गायकवाड यांनी केले. डॉ.श्रुती प्रवीण गायकवाड यांनी आभार मानले.