शितलकुमार अहिवळे: महान्यूज लाईव्ह
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना फलटण येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण आहे. सुशोभित पुर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी जुना पुतळा काढून त्या जागी नवीन पुतळ्याची उभारणीचे काम कित्येक महिने चालू आहे, परंतु ते अद्यापही पूर्णत्वास गेले नाही.
यासंदर्भात कित्येकदा निवेदने व आंदोलने झाली आहेत. यावेळी गांधीजींचा पुतळा १५ ऑगस्ट पूर्वी बसला नाही, तर तीव्र आंदोलन करून उपोषणाचा इशारा फलटण राष्ट्रीय काँग्रेसतर्फे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
गजानन चौक फलटण येथे गांधीजी यांचा पुर्णाकृती पुतळ्यासाठी फक्त चौथारा बांधून ठेवला आहे, त्याचे संपूर्ण काम कधी पूर्ण होणार? यासंदर्भात काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची प्रत्येक्ष भेट घेत विचारणा केली. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हा पुर्णाकृती पुतळा उभा राहिला नाही तर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले व निवेदन दिले.
यावेळी मुख्याधिकारी यांनी पुतळ्याचे संपूर्ण काम वेळेत पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली आणि स्वच्छतेच्या समस्यांविषयी कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी फलटण अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), तसेच फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष आमीर शेख, श्री पंकज पवार, अजिंक्य कदम, प्रीतम जगदाळे, श्री अल्ताफ पठाण, अजिंक्य कदम, गंगाराम रणदिवे, नितीन जाधव, धनंजय गोरे उपस्थित होते.