इंदापूरच्या व्यापार क्षेत्रात योगदान दिलेल्या शकुंतला शहा यांनी ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

इंदापूर शहरातील नामांकित कापड व्यापारी व शहा ब्रदर्सचे मालक, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मातोश्री,व गोकुळदास शहा यांच्या पत्नी कै.शकुंतला (भाभी)शहा (वय ८२) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.

अकलूज येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आसताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठीमागे पती, मुलगा, मुली, नातु असा परिवार असुन इंदापूरच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या त्या सासु होत.

कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या त्या चुलती होत. प्रगतशील शेतकरी अंगद शहा यांच्या त्या आजी होत. काल सायंकाळी त्यांच्यावर इंदापूरात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यापार व व्यवसायाच्या दृष्टीने त्यांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे आज इंदापुरातील व्यापार क्षेत्रात त्यांचे नाव अग्रगण्य घेतले जाते.

चोख व्यवहाराबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील त्यांनी कुटुंबाबरोबरच जपली. स्वातंत्र्यसैनिकांचा आलेला वारसा पुढे नेत त्यांनी समाजाशी ऋणानुबंधाचे नाते आपल्या कुटुंबातील मुलांनी जोपासण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago