औरंगाबाद महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारमध्ये अगोदर ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट मध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव केले.. मग सत्तेवर शिंदे फडणवीस यांचं सरकार आलं.. मग त्यांनी हा निर्णय रद्द केला.. मग चौथ्या दिवशी दोघांचीच कॅबिनेट झाली.. त्यात मात्र औरंगाबादचं संभाजीनगर झाले.. हा एवढा प्रताप राज्यात सुरू असतानाच तिकडे गुगलमध्येही बराच राडा झाला…
अगोदर ठाकरे सरकारने निर्णय घेतला, त्यानंतर शिंदे- फडणवीस यांनी निर्णय घेतला, मात्र त्यावर गॅझेट होण्यापूर्वीच, केंद्राचे शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच गुगलने दोन्ही शहरांची नावे बदलली.. मग औऱंगाबादच्या जागी संभाजीनगर तर उस्मानाबादच्या जागी धाराशीव ही नावे झळकली. मान्यतेआधीच ही नावे बदलल्याचे लक्षात येताच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुगलला प्रश्न विचारला.
मग मात्र गुगल हडबडले आणि त्यांनी पुन्हा ही नावे बदलली. आता काही दिवसांपूरतीच ही नावे पुन्हा एकदा औरंगाबाद व उस्मानाबाद अशी दिसणार आहेत. राष्ट्रपती व राज्यपालांचे शिक्कामोर्तब झाले की, ही नावे पुन्हा संभाजीनगर व धाराशीव अशीच दिसणार आहेत असे सांगितले जात आहे.
गुगल वर अनाधिकृत नावे बदल हा राष्ट्र हितासाठी धोका आहे, कायद्याचे अज्ञान,अजनही काही गावांची नावे अनाधिकृत बदल केलेला दिसुन येतो, तो अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयास देणेत यावा तोही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाले नंतर च,