संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा शहराची बाजारपेठ ही राज्यातील प्रमुख बाजारपेठांप्रमाणेच गजबजलेली बाजारपेठ आहे. अशा बाजारपेठेतील वर्दळीचा अंदाज घेत बराच मामला हातात येऊ शकतो असा अंदाज बांधून रात्री चोरट्यांनी दुकाने फोडली.. मात्र हातात काही लागलेच नाही.. फक्त एक बिअरची बाटली घेऊन चोरट्यांना बाहेर पडावे लागले..
चोरट्यांनी मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंतच्या वेळेत भगवती कॉम्प्लेक्समधील नवरंग जनरल स्टोअर्स, लाटे किराणा दुकानासह एक पुस्तकाचे दुकान फोडले. शटर वाकवून दुकाने फोडण्याचे कष्ट उपसल्यानंतर या तेथे काहीच उपयोगाचे मिळाले नाही. मग या चोरट्यांनी वाईन शॉप फोडले. मात्र या दुकानात फक्त एक बिअरची बाटली त्याला मिळवण्यात यश आले.
रात्रभर चोऱ्या केल्यानंतरही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे समाधान असले तरी बुलडाणा शहरात एकाच रात्रीत चार दुकाने फोडली जातात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली आहे.