पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात आज बापलेकीचा भरधाव ट्रकने जीव घेतला.. शाळेत मुलीला सोडण्यासाठी निघालेल्या बापाच्या दुचाकीला खड्ड्यांमुळे ट्रकची धडक बसली.. यात बापाचा ट्रकखाली सापडून व तर मुलगी दूर फेकल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचाही दुर्दैवी अंत झाला..
ही घटना फुरसुंगी -हडपसर मार्गावर सातववाडी येथील ग्लायडींग सेंटरच्या समोर घडली. यात निलेश साळुंके (वय ३५ रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) व मिनाक्षी निलेश साळुंखे (वय १० वर्षे, रा, ढमाळवाडी) या दोघांचा जीव गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश हे त्यांची मुलगी मिनाक्षी हिला साधना विद्यालयात सोडण्यासाठी निघाले होते. सातववाडीनजिक पाठीमागून ट्रक भरधाव आला. ट्रकने निलेश साळुंखे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत ट्रकखाली दुचाकी व निलेश साळुंखे दोन्ही सापडले. यात निलेश या्ंचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील मिनाक्षी दूर फेकली जाऊन ती आदळल्याने गंभीर जखमी झाली यात तिचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक दिलीपकुमार पटेल (रेवा, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.