सोलापूर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या विचारात आहेत. उमेश पाटील व राजन पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांचा हा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्याने याचे संकेत दिले आहेत. एकंदरीत राजन पाटील हे भाजपात प्रवेश करण्याच्या विचारात असल्याची चर्चा असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे,
इंदापूरातील यशवंत माने हे मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र त्यांच्यामागे राजन पाटील यांची ताकद असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे एव्हाना सर्वांनाच माहिती आहे. अशा स्थितीत जर राजन पाटील भाजपात गेले, तर मोहोळची राष्ट्रवादीची सद्दी संपणार का? असाच प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आहे.
इंदापूर तालुक्याला दुसरा आमदार हा राजन पाटील यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मिळाला, मोहोळमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला, आता राज्यातील सत्तांतरानंतर हळूहळू महाविकासआघाडीतील मतभेद पुढे येऊ लागले आहेत. येणाऱ्या काळात पु्न्हा एकदा सन २०१९ च्या वेळची पुनरावृत्ती होऊ शकते का हे पाहणे महत्वाचे ठरेल.