बारामती : महान्यूज लाईव्ह
गुन्हेगारीच्या बाबतीत कधी काय घडेल याचा आता भरवसाच उरला नाही. रम, रमा आणि रमी माणसांच्या आय़ुष्यात नेमकी कसली वादळे आणेल याचाही आता भरवसा उरला नाही. बारामती तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात तर दारूची नशा चढलेल्या पतीला आपला संसार आणि नैतिकताही उरली नाही. त्याने आपल्याच पत्नीशी मित्राला शारीरीक संबंध ठेवायला लावले.
तांदूळवाडी येथील पिडीतेने काल रात्री यासंदर्भात बारामती तालुका पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी लागलीच बलात्काराचा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल करून पती व त्याचा मित्र शेखर सयाजी माळशिकारे (रा. बेलदारपाटी, तांदूळवाडी. ता. बारामती) यास अटक केली.
यासंदर्भात सहायक निरीक्षक योगेश लंगुटे यांनी अधिक माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला तिच्या पतीसह तांदूळवाडी परिसरात राहते. या पिडीत महिलेच्या घरी माळशिकारे हा अनेकदा येत होता.
काल रात्री माळशिकारे हा पिडीत महिलेच्या पतीसह तांदूळवाडी येथील घरी आला. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या पतीने माळशिकारे याच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवण्याची पत्नीला सूचना केली. त्यास विरोध केला असता माळशिकारे व पतीनेही तिला लाथाबुक्क्या्ंनी मारहाण केल्याचे पिडीतेने तिच्या फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.