हायवेच्या अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग भिगवणकरांच्या मुळावर! फक्त गटारासाठी लोकांना द्यावा लागतो, रस्ता रोकोचा इशारा!

भिगवण : महान्यूज लाईव्ह

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण मध्ये गटारांची दूर्दशा झाली असून, त्यातून रोगराई पसरत आहे. त्याची दुरुस्ती करावी याकरता अनेक संघटना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांचा पाठपुरावा करत आहेत, मात्र त्याला दाद दिली जात नाही. अखेर अखिल भारतीय मराठा महासंघाने यासंदर्भात 31 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गाची सातत्याने स्वच्छता राखणे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम आहे, मात्र भिगवणमध्ये गटारी तुंबलेल्या आहेत आणि त्यामुळे रोगराई पसरत आहे. या संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, भिगवण येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडील असलेल्या गटारीची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे रोगराई पसरत आहे सध्या पावसाचे दिवस चालू असून गटारी तुंबलेल्या आहेत. या गटारींची पूर्ण स्वच्छता करावी तसेच ज्या लोकांनी कायमस्वरूपी सिमेंटचे पाईप टाकलेले आहेत ते पाईप आहे तसे ठेवून यंत्राच्या साह्याने त्यामध्ये साचलेला गाळ काढून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जर या गटारी दुरुस्त झाल्या नाहीत तर मोठ्या रोगराईला भिगवण आणि परिसरातील लोकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे लक्ष देत नसल्याने 31 जुलै रोजी रस्ता रोको करणार आहोत.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

16 hours ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

2 days ago