महान्यूज इंटरनॅशनल रिपोर्ट
जपान मधील नारा शहरात भाषण देत असताना जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला असून ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जपानमध्ये रविवारी सार्वत्रिक मतदान असून त्या संदर्भातील निवडणुकीच्या कॅम्पेन करता ते भाषण देत होते.
शिंजो आबे जपानचे पंतप्रधान असून ते शुक्रवारी नारा शहरात भाषण देत होते. जपान मधील एनएचके या वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली. ते भाषण देत असताना पाठीमागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती तेथील वृत्त संस्थांनी दिली आहे.
दरम्यान शिंजो आबे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या असून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सन 2007 मध्ये ते सत्तेवरून पाय उतार झाले आहेत.