शिवसेनेच्या माजी आमदार, पोलीस निरीक्षकासह वीस जणांवर ॲट्रॉसिटी!

पुणे : महान्यूज लाईव्ह

दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांवर जातीवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयाचा आदेश होता.

कोंढवा पोलीस ठाण्यात महादेव बाबर यांच्यासह कार्यकर्ते नारायण लोणकर, अब्दुल बागवान, असलम बागवान, राजेंद्र बाबर, राजू सय्यद, शेख, दीपक रमानी व पोलीस निरीक्षक श्री. जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, सहायक फौजदार कामते, महिला पोलीस शिपाई सुरेखा बडे, हवालदार श्री गरुड, पोलीस शिपाई नदाफ यांच्यासह वीस जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 10 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर पहाटेपर्यंत कोणार्कपुरम सोसायटीच्या बाहेर घडली. यासंदर्भात न्यायालयाने कलम 156 एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी शिवसेनेने भारत बंदचे आवाहन केले होते.

त्यानुसार कोणार्कपुरम सोसायटीच्या बाहेर असलेला स्टॉल विक्रेत्याने बंद ठेवला नाही म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी स्टॉल मधील साहित्य रस्त्यावरती फेकून दिले‌. तसेच माजी आमदार महादेव बाबर, अब्दुल बागवान यांनी जातीवाचक शिवीगाळ करून हाताने मारहाण केली अशी फिर्याद फिर्यादीने दिली होती.

मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री जानकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिर्यादीलाच मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

24 hours ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago