बारामती : महान्यूज लाईव्ह
तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे देशभरात बँकिंग क्षेत्रामध्ये विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच बारामतीतही तुळजाराम क्षेत्र महाविद्यालयात बँकांची भरती प्रक्रिया होणार आहे 16 जुलै रोजी होणाऱ्या या प्रक्रियेसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ही भरती प्रक्रिया तुळजराम महाविद्यालयातील जीवराज सभागृहात 16 जुलै रोजी होणार असून याकरिता महाविद्यालयाच्या भरती कक्षाने अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.
या भरती प्रक्रिया अंतर्गत भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता उमेदवारांकरिता पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार असून पंधरा हजार रुपये प्रतिमा अधिक प्रोत्साहन भत्ता असे या भरतीचे सुरुवातीचे स्वरूप असणार आहे.
16 जुलै रोजी महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहात सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया होणार असून यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन या महाविद्यालयाचे भरती कक्षाचे अधिकारी श्री कृष्णा काळे यांनी केले आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : (मो . ८७६७९५१६९०) श्री. कृष्णा काळे, प्लेसमेंट ऑफिसर, तु. च. महाविद्यालय, बारामती )
Bank
Job
JRO
Post
GRO
Yes