महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
स्वप्न खरी होतात? रात्री पाहिलेली की पहाटे पाहिलेली स्वप्नं खरी होतात? असे बरेच प्रश्न प्रत्येकाला पडतात.. मात्र खरोखरच एक घटना घडली आहे, ज्यामध्ये रात्री पडलेल्या स्वप्नानुसार त्याने दिवसा तिकीट खरेदी केले आणि संध्याकाळपर्यंत तर तो करोडपती बनला…
अगदी स्वप्नवत वाटावी अशी ही खरी कहाणी घडली आहे अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील रहिवासी अलोंजो कोलमॅन यांच्या बाबतीत..! अलोंजो यांनी मिलीयन बॅंक या लॉटरी कंपनीचे लॉटरी तिकीट खरेदी केले होते. अर्थात यामागची कहाणी मात्र स्वप्नवतच आहे..
अलोंजो यांना त्या तिकीटाच्या खरेदीच्या अगोदरच्या रात्री झोपेत स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्यांना लॉटरी लागली. त्यासाठी त्यांनी स्वप्नात जे तिकीट खरेदी केले, त्याचा क्रमांक त्यांनी झोपेतून उठल्यावरही लक्षात ठेवला होता.
सकाळी उठून बाजारात गेल्यानंतर योगायोगाने त्याच क्रमांकाचे लॉटरी तिकीट त्या दुकानात होते. त्यांनी ते तिकीट खरेदी केले आणि दुसरा योगायोगाचा व सुखद धक्का त्यांना बसला. याच तिकीटाच्या नंबरने दोन कोटींची लॉटरी जिंकली. ज्यामुळे अलोंजो एकाच दिवसात दोन कोटींचा मालक बनले.
अलोंजो हे अमेरिकेतील व्हर्जनिया प्रांतातील एका सरकारी कंपनीतील निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी केवळ १५८ रुपयांचे हे तिकीट खरेदी केले होते. त्या तिकीटाने त्यांना १ कोटी ९८ लाख मिळवून दिले. यासंदर्भातील वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी लागलीच प्रसारित केले. मात्र त्यातील स्वप्नाच्या गोष्टीने त्या बातमीत जास्त ट्विस्ट आणला..