कळस : महान्यूज लाईव्ह
बिरंगुडी (ता. इंदापुर) येथील बिरंगाई देवीची यात्रा बुधवार दि १३ जुलै रोजी होणार आहे यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली.
कळस (ता इंदापूर) येथील बिरंगुडी या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा महोत्सव होणार आहे. नवसाला पावणारी देवी अशी या ठिकाणची ख्याती आहे. यात्रेसाठी पुणे, सातारा, नगर व मुबई येथून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. येथे देवीचे भव्यदिव्य मंदीर उभारण्यात आले आहे.
बुधवारी (दि १३ रोजी) सकाळी ५ वाजता पकाळणी, ६ वाजता अभिषेक व त्यानंतर ८ वाजता गावातून गुलालाची उधळण करत तोफांच्या सलामीत सवाद्य छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. ९ वाजता गावकऱ्यांच्या वतीने मानाचा पोशाख नाराळ अर्पण व मंदीरात भक्तांचा भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे.
दिवसभर भाविकांकडून नवसाची परतफेड करण्यात येणार आहे, तसेच यात्रा होणार आहे. सांयकाळी ‘पाव्हण फक्त तुमच्यासाठी’ हा मनोरंजनासाठी आँर्केस्टा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात्रेनिमित भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य, दिवाबत्ती व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे, तसेच मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.