सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका कोचिंग क्लासमधला शिक्षक एका चिमुकल्याला लाकडाच्या फळीने मारत होता. तो मुलगा बेशुद्ध होईपर्यंत तो मारत होता. हे कृत्य पाहून महाराष्ट्रातील पालकांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अर्थात हा व्हिडिओ बिहार मधील पाटणा भागातील धनुर्वा या गावातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा..
बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील धनुर्वा या गावातील सैनिकी शाळेत शिकवणी देणाऱ्या शिक्षकाकडून हा प्रकार घडला आहे. हा घृणास्पद प्रकार घडल्यानंतर गावातील पालकांनी या शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.
धनरुवा या गावामध्ये सैनिकी शाळेत शिकवणाऱ्या मुलांना शिकणाऱ्या मुलांना विकासकुमार उर्फ छोटू नावाचा शिक्षक शिकवतो. हा शिक्षक मनोविकृत असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. हा शिक्षक शिल्लक कारणावरून मुलांना बेदम मारत असे. त्याच्याकडूनच ही घटना घडली आहे. किरकोळ कारणावरुन राग आलेल्या या छोटू नावाच्या शिक्षकाने विद्यार्थ्यावर हा राग एवढ्या विकृत पद्धतीने काढला की फक्त बिहारमध्येच नव्हे तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान हा छोटू शिक्षक चिमुकल्या विद्यार्थ्याला लाकडाच्या फळ्या मोडेपर्यंत व बेशुद्ध होईपर्यंत मारत होता. हे कृत्य एका दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलवरती चोरून चित्रित केले. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या शिक्षकाला बेदम चोप दिला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा शिक्षक तिथून पळून गेला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.