बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील तरडोलीजवळील तुकाईनगर येथील एका विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोमल अजीत तांबे ही २० वर्षाची विवाहिता आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात घरकाम करत असताना तिला सर्पदंश झाला. त्यानंतर तिला तात्काळ मोरगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू प्राथमिक उपचारानंतर प्रकृती ढासळत असल्याने तिला अधिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतू उपचार करत असताना तिचा मृत्यू झाला. कोमलच्या पश्चात पती, सासू सासरे, आई वडील असा परिवार आहे.
तिच्या मृत्युमळे तरडोली आणि मासाळवाडी परिसरातील ग्रामस्थांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे.