मुंबई : महान्यूज लाईव्ह
विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहूल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर सत्तेचा तराजू आता एकनाथ शिंदेच्या बाजूने आणखी झुकु लागला आहे. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेने एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून अजय चौधरी यांची केलेली निवड रद्द ठरवली आहे.
याचप्रमाणे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची एकनाथ शिंदे गटाने केलेली हकालपट्टीही योग्य ठरविण्यात आली असून भरत गोगावले यांना गटनेतेपदी नेमण्याचा या गटाचा निर्णयही योग्य ठरविण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विधीमंडळात तरी एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना म्हणून ओळखली जाणार आहे.
आता या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांपुढे अडचण निर्माण होऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रदोत भरत गोगावले यांनी काढलेला व्हीप उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या आमदारांनी मानला नाही, या कारणावरून आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांचे निलंबनही होऊ शकते. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्यासह १६ आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार लटकते आहे.
दुसरेकडे शिंदे गटाविरोधात न्यायालयात गेलेल्या प्रकरणातही न्यायालयाने शिंदे गटाचीच बाजू उचलून धरली आहे. आता आता तिथेही उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.
काल रात्री उशीरा महाराष्ट्र विधीमंडळाच्या नावाने हे पत्र प्रसिद्धीस देण्यात आलेले आहे.