सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात इंदापूर येथे वैष्णवांसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले. पुणे येथील प्रख्यात एम.डी. नेत्र रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर यांनी वारकऱ्यांचे डोळे तपासणी करून अचूक नंबरचे चष्मे वाटप केले.
कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा, जिजाऊ फेडरेशन अध्यक्षा भाग्यश्री पाटील, जि.प.सदस्या अंकिता पाटील – ठाकरे व संचालक, कार्यकारी संचालक देवराव लोकरे आदी उपस्थित होते.