मुंबई : महान्यूज लाईव्ह
विधानसभेत आज झालेल्या आमदारांच्या श्री गणतीत भाजप आणि शिंदे गट प्रभावी ठरला असून राहुल नार्वेकर यांना विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी 164 मध्ये पडल्याने ते विजयी झाले. अर्थात शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाने शिंदे यांच्या गटाला समर्थन केले.
आज विधानसभेत अध्यक्ष पदासाठी मतदान झाले यावेळी विधीभवनाच्या नियम क्रमांक सहा नुसार आवाजी मतदानाने नव्हे तर शिरगणतीद्वारे विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाली. यामध्ये भाजप, अपक्ष आणि शिंदे गटाच्या आमदारांनी 164 मते राहुल नार्वेकर यांच्या पारड्यात टाकली. बहुमताचा आकडा पार केल्याने राहुल नार्वेकर हे विजयी झाले.
महाविकास आघाडीच्या बाजूला 107 मते मिळाली. दरम्यान आता यावर शिवसेना काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर काय नेमके कारवाई होणार याची आता उत्सुकता आहे.