सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भरणेवाडी येथे येऊन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी निधन झाले. भरणे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी गिरीजाबाई भरणे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मधुकर भरणे, रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे व भरणे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.