पुणे : महान्युज लाईव्ह
युवा सेनेच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभा जिल्हा अधिकारीपदी कातवी ( ता. मावळ) येथील शिवभक्त पै. अनिकेत घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्राद्वारे ही माहीती कळविली आहे. घुले यांच्या निवडीचे युवा सेनेसह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घुले यांची जिल्हा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. अनिकेत घुले हे यापूर्वी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत होते. त्याआधी त्यांनी युवा सेना मावळ तालुका अधिकारीपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. तरुणांचे मोठे संघटन त्यांनी युवा सेनेत केले आहे. शिवशक्ती -भीमशक्ती एक व्हावी, यासाठीही ते प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या विविध भागात नेतृत्व विकास कार्यशाळांचे आयोजन करून सक्षम व निर्व्यसनी तरुण घडविण्याचे काम सुरु केले आहे. निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे.
दरम्यान, पक्षनिष्ठेचे मोठे फळ मिळाले आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि युवा सेना राज्य विस्तारक राजेश पळसकर यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची मजबूत बांधणी करणार असल्याची ग्वाही घुले यांनी दिली आहे.