इंदापूर : महान्यूज लाईव्ह
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे तथा जिजी यांचे आज सकाळी निधन झाले. दुपारी दोन वाजता भरणेवाडी येथे अंतिम संस्कार होणार आहेत.
गिरीजाबाई भरणे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परिसरात त्या जीजी या नावाने परिचित होत्या. भरणेवाडीतील भरणे कुटुंबाचा मोठा पसारा आणि व्याप सांभाळताना त्यांनी कौटुंबिक संस्कार व मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले.
आज सकाळीच अंथुर्णे येथील मुक्काम आटोपून संत तुकोबारायांच्या पालखीने निमगाव मुक्कामाकडे प्रस्थान केले. त्यानंतर सकाळी दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची माहिती परिसरात समजली. त्यामुळे परिसरातील नातेवाईकांसह भरणेवाडी, अंथुर्णे व परिसरावर शोककळा पसरली आहे.