बारामती : महान्यूज लाईव्ह
दारू, पेट्रोल कधी काय करेल, कुठे आग लावेल सांगता येत नाह. रम, रमा आणि रमीच्या नादात भलेभले वाहून जातात, तिथे 40 प्रवाशांची प्रवासाची जबाबदारी असलेला कंडक्टर काय अपवाद? आज पुन्हा एकदा जास्त डांबर टाकलेल्या जेजुरीच्या रस्त्यावर अपघात घडला. तो घडला होता, दारूच्या बाटल्यांच्या गाडीचा..! मग काय, त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या उचलण्यासाठी बघ्यांची आणि चोरांची गर्दी झाली, त्यात अगदी कंडक्टर सुद्धा मागे नव्हता..!
हा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
जेजुरी मोरगाव रस्त्यावर जेजुरी पासून काही अंतरावर रस्त्याच्या एका बाजूला ठेकेदाराने जास्त डांबर टाकून रस्ता केला आहे. तो रस्ता पावसामुळे निसरडा होतो. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर शिवशाही बस घसरून मोठे नुकसान झाले होते. या शिवशाही बसच्या अगोदरच लालपरी बसचादेखील अपघात झाला होता.
त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे इकडे दुर्लक्ष आहे. आज सकाळी पुन्हा एकदा रिमझिम पावसात जेजुरी मोरगाव रस्त्यावर आयएसएमटी ते मावडी कडेपठारच्या दरम्यान हा अपघात झाला. दारूच्या बाटल्या घेऊन निघालेला छोटा टेम्पो आणि ट्रेलर यांच्या झालेल्या अपघातात दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर पडले आणि अगदी काही वेळातच दारूचा वास अनेकांपर्यंत पोहोचला…
हा अपघात पाण्यासाठी झालेली बघायची गर्दी आणि पडलेले दारू उचलण्यासाठी दारूच्या बाटल्या उचलण्यासाठी झालेली चोरांची गर्दी, या गर्दीत अगदी बसेस देखील थांबल्या. दारूच्या बाटल्या उचलून घेतानाचे चित्रीकरण काही नागरिकांनी केले. यामध्ये अगदी एका बसमधील कंडक्टर दारूची बाटली उचलताना दिसत आहे.