मुंबई: महान्यूज लाईव्ह
सन 2004 मध्ये शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हापासून 2020 पर्यंतच्या निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून आयकर खात्याने आता शरद पवार यांना नोटीस दिली आहे. शरद पवार यांनी स्वतः आज याची माहिती पत्रकारांना दिली.
राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार संदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता काही ठराविक लोकांना आयकाराच्या नोटिसा पाठवल्या जात असल्याबद्दल शरद पवार यांनी पत्रकारांची लक्ष वेधले आणि त्यांनी त्यांना आलेल्या नोटीसींची माहिती थेट पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार यांनी सन 2004 मध्ये लढवलेल्या निवडणुकीमध्ये जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर सन २००९ सन २०२० पर्यंतच्या वेगवेगळ्या निवडणुका संदर्भात आत्ता आयकर खात्याने नोटीस पाठवले आहे.
दरम्यान पवार म्हणाले, विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी हे काम केले जात असून, सन 2004 पासून माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे आयकर खात्याच्या कामात गुणात्मक वाढ झाल्याचे दिसते असा टोमणा पवार यांनी मारला.
दरम्यान मी याच्या संदर्भात सर्व माहिती घेतलेली असून माजी सर्व माहिती व्यवस्थित असल्याने मला चिंता करण्याची गरज नाही, मात्र ठराविक लोकांनाच या नोटीसा पाठवल्या जात आहेत असे पवार यांनी सांगितले.