दिल्ली : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील राजकारण घडोघडी व प्रत्येक क्षणाक्षणाला वेगवेगळे वळण घेताना दिसत आहे, आपण मंत्रिमंडळात असणार नाही अशी घोषणा केल्यानंतर काही क्षणातच भाजपचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निरोप कळवला असून देवेंद्र फडणवीस हे या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असणार आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची अनाकलनीय व अनपेक्षितरित्या निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा बॉम्ब टाकत एकाच दगडात अनेक पक्षी मारून टाकले. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी केलेला मास्टर स्ट्रोक गेल्या काही तासांपासून अनेकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे.
मात्र त्यानंतर काही क्षणातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा सल्ला व एका अर्थाने आदेश दिला आहे.
जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून मंत्रिमंडळातून बाजूला राहण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी पदाची लालसा नसलेला व त्यागाचे प्रतीक असलेला पदाधिकारी व कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट दाखवतो.
परंतु भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना या मंत्रिमंडळात राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा सल्ला दिला आहे. तरी देवेंद्र फडणवीस यांना याद्वारे भारतीय जनता पक्षाचा एक अर्थाने आदेश आहे की, त्यांनी या राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री व्हावे.
संध्या ७.५० – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांचे व्टिटव्दारे अभीनंदन केले आहे.