दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील महाराष्ट्र बँकेतून ज्येष्ठ नागरिकांनी ६० हजार रुपये काढून पिशवीत ठेवले होते ते पैसे अज्ञात चोरट्यांनी लंपास के केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान दोन संशयित महिलांची सिद्धी महाराष्ट्र बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशी माहिती पाटस पोलिसांनी दिली. शपथ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंदी गावातील दिलीप शिवाजी खराडे ( वय ६० ) हे मंगळवारी ( दिनांक २८ ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते त्यांनी आपल्या खात्यातून साठ हजाराची रक्कम काढली. त्यांनी ते पैसे मोजून पिशवीत ठेवले आणि बॅंक पुस्तक भरण्यासाठी रांगेत नंबरला उभे राहिले त्यावेळी त्यांच्या हातातील पिशवीत कापून पिशवीतील साठ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.याबात दिलीप खराडे यांनी पाटस पोलीस चौकीला फिर्याद दिली आहे.
दरम्यान बँकेत त्यांच्या पाठीमागे दोन संशयित महिला उभ्या असुन त्यांनी पिशवीकापुन चोरी करून साठ हजार रुपये लंपास केले असल्याचे बॅंकेच्या सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहे. या दोन महिलांनी एकापाठोपाठ बँकेत प्रवेश केल्याचाही सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये दिसत आहे.
दरम्यान, काही महिला बँकेच्या खातेदार नाहीत परंतु बँकेत प्रवेश करून त्या ज्येष्ठ नागरिक व महिला यांना हेरून त्यांच्याकडील पैसे चलाखीने चोरुन लंपास होत असल्याचे प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे बँकेत पैसे काढताना किंवा भरताना आजूबाजूला अनोळखी व्यक्ती दिसल्यास आपले पैसे काळजीपूर्वक व सुरक्षित ठेवावेत. याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. तसेच संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पाटस पोलिसांनी केले आहे.