बारामती : महान्यूज लाईव्ह
संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या दिंडीतील 12 वारकऱ्यांना लागण झाल्याची कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान वारकऱ्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी बारामतीला पाठवण्यात आले आहे.
आज बारामतीचा मुक्काम आटोपून तुकोबारायांच्या पालखी सोहळा मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सकाळी काटेवाडीत पोहोचलेल्या काही वारकऱ्यांना त्रास होत असल्याची माहिती मिळाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांची तपासणी केली.
येथील रॅपिड एंटीजेन चाचणीत १२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून या वारकऱ्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. या वारकऱ्यांना सौम्य लक्षणे आहेत अशी माहिती त्यांनी दिली.