सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे १९९५ चा पुर्वीच्या न्यु इंग्लिश स्कुलचा दहावीचा वर्ग तब्बल २७ वर्षांनी पुन्हा भरला. यावेळी यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्नेहमेळावा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रसिद्ध सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी शालेय काळातील आठवणींना उजाळा देत गुरूजनांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.१९९५ च्या काळातील विद्यार्थी सध्या अमेरिकेत असणारा बाळासाहेब वाघमोडेसह जवळपास १७ शिक्षकांनी यावेळी उपस्थिती लावली. दिवंगत शिक्षक कै.सुदाम शेवते, सातपुते, बी.एल.बनसुडे यांना श्रद्धांजली अर्पण करणेत आली.अनेकांचे डोळे पाणावले होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून एक लाख रूपयांचे व्हाईट बोर्ड शाळेस भेट देण्याचे ठरले.काटेसावर,ताम्हण,जांभूळ,चिंच,लिंब,पिंपळ,तुळस या देशी १०१ वृक्षांची लागवड शाळेत करण्यात आली.
सेवानिवृत्त माजी उपशिक्षणाधिकारी विलास भागवत,जाधव पी.आर,पर्यवेक्षक शिंदे ए.झेड,जाधव एस.बी, श्रीमती सय्यद ए.एम, गाडेकर,चोरमले एस.आर,देवकर सी.डी, सावंत आर.ए,बनसुडे जे.एन, उत्तम श्रीरामे,सयाजी काटकर,मोहिते ए.व्ही,भीमराव वणवे,सुनिल मोहिते,वृक्षमित्र शिरसट उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी केले.सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुहास मोरे व नवनाथ शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वतीतेसाठी गोकुळ हराळे, विशाल ढोकरे,सुनिल बोराटे,गणेश राऊत,महादेव वाघमोडे,प्रा.अमित दुबे,संतोष जामदार, बाळासाहेब वाघमोडे,राजेश शुक्ल, जमीर शेख,अनिल जाधव,जिजाबा जाधव,संतोष मखरे, सचिन भालेराव, महावीर मखरे,उत्तम गायकवाड, महावीर गायकवाड,प्रा.सुमन श्रीरामे, प्रा.वैशाली गवारे,प्रा.रिहाना सय्यद,रोहिणी शिंदे,सुनील जाधव,प्रकाश शिंदे,मनिषा साबळे,सुनंदा गलांडे, मीना राऊत यांनी प्रयत्न केले.