बारामती : महान्यूज लाईव्ह
वैष्णवांचा मेळा आज मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने बारामतीमध्ये आला… पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आज ठेवून निघालेला वैष्णवांचा मेळा आज राजकीय पंढरीत म्हणजे बारामतीच्या वेशीवर पोहोचला, तेव्हा बारामतीच्या देशमुख चौकात हा सोहळा येत असतानाच राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी संशयितांच्या नजरा हेरल्या.. अन हा पालखी सोहळा अधिक सुरक्षित पंढरी पर्यंत जाण्यासाठी संशयितांना ताब्यात घेतले..
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह Mahanews.Live फेसबुक पेजवर पाहू शकता
पालखी सोहळा म्हटलं की हा जगातील स्वयंशिस्तीचा महासोहळा आहे. या महासोहळ्यात वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दरवर्षी पोलीस असतातच, मात्र यावर्षी काही व्हिडिओ आणि चित्रफिती समोर आल्यानंतर पोलिसांची पथके अधिक सतर्क झाली.
आज बारामतीत तुकोबारायांचा पालखी सोहळा पाटस चौकात पोहोचत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी आणि पोलिस दलाच्या कर्मचार्यांनी व अधिकाऱ्यांनी सापळा रचत संशयितांवर नजर ठेवली आणि आपल्या चाणाक्ष नजरेतून जे जे संशयित दिसत आहेत, त्यांना अगदी वायुवेगाने ताब्यात घेतले.
बघता बघता या संशयितांनी अख्खी बस भरली.या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून पालखी सोहळा सुरक्षितरीत्या मार्गस्थ झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अर्थात त्यांची रवानगी त्यांच्या गावी करण्यात येऊन त्यांच्यापैकी जे कोणी या वारीच्या सोहळ्यात चोरीचे गालबोट लावत असतील, त्यांची मात्र कसून चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
Video khuthe aahy