डॉ. चंद्रकांत पिल्ले, बारामती
महाराष्ट्रच्या राजकारणात
‘झिरवळां’चं राज्य आहे
मुख्यमंत्री कुणीही असो
सध्या ‘बहुमत’ माझं आहे
‘शिंदेसेने’त ‘शिवसेने’ची
तरुण तुर्क हिरवळ आहे
‘सत्ता’ अन ‘नाथा’ मध्ये
उभा म्हातारा ‘झिरवळ’ आहे
नवनवीन घडामोडींनी
प्रत्येक दिवस गाजतो आहे
सर्वच पक्षांमध्ये आता
संशयकल्लोळ माजतो आहे
‘एकनाथा’ने फुंकले रणशिंग
मेळा भरला ‘आसामी’
‘उद्धवा’च्या पंढरीत आली
बंडखोरांची सुनामी||
दृष्टी असूनही ‘संजय’ आंधळा
बेफाम बोलत सुटला आहे|
‘धृतराष्ट्र’ बिचारा मुका बहिरा
राजकारणातून ‘उठ’ला आहे||