मुंबई : महान्यूज लाईव्ह
खरा खुरा पाऊस हुलकावणी देत असला तरी आता आताच लग्न झाल्याच्या बातम्यांचा पाऊस पडून गेला, त्यानंतर लगेचच आलिया – रणबीरकडे ‘ गुड न्यूज ‘ असल्याची बातमी आली आहे. लग्न झाल्यानंतरच लगेचच ही बातमी आल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बॉलिऊड अभिनेत्री आलिया भटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपण आई होत असल्याची बातमी शेअर करत एक पोस्ट टाकली आहे. त्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. मात्र या सगळ्या शुभेच्छांमध्ये कंडोम कंपनीच्या एका शुभेच्छेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘ महफिल में तेरी हम तो क्लिअरली नही थे ‘ अशी पोस्ट करत ड्युरेक्स या कंडोम बनविणाऱ्या कंपनीने या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरच्याच एका सुपरहिट गाण्याच्या ओळी बदलून एकदम भन्नाट पद्धतीने या कंपनीने दिलेल्या या शुभेच्छांनाही आता नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळताना दिसत आहेत.
दुसरीकडे आलियाने आपल्या पोस्टमध्ये ती, रणबीर आणि अल्ट्रासाऊंड मशीन असलेला एक फोटो शेअर केला आहे. यात ती बेडवर झोपलेली असून त्या मशीनकडे पहात आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सिंहाच एक कुटुंब दिसत असून सिंहीण सिंहाकडे प्रेमाने बघत आहे आणि त्यांचा नवजात छावासुद्धा त्यात दिसत आहे. या पोस्टलाही बॉलिऊडच्या अनेक तारेतारकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.