बारामती : महान्यूज लाईव्ह
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आज ( दि. २८ ) रोजी संध्याकाळपर्यंत बारामती मुक्कामी येणार आहे. बारामती प्रशासनाने पालखीच्या मुक्कामाच्या व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पालखी मुक्कामाच्या काळात स्वच्छता रहावी यासाठी विशेष काळजी घेतली असून शहरात बारा ठिकाणी विशेष शौचालयांची व्यवस्था केली असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. सराफ पेट्रोल पंपाशेजारील मोकळी जागा, नेवसे रोडवर नगरपालिका स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूला, ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाशेजारी नीरा डाव्या कालव्यालगत, शिवकृपा हौऊसिंग सोसायटीशेजारील मोकळी जागा, दाते गणपती मंदिराजवळ कऱ्हा नदीच्या पात्राशेजारी, मार्केट यार्डमध्ये विहिरीजवळ व सेल हॉलशेजारी, इंदापूर रोडवर मोतीबाग, देसाई इस्टेटमधील मोकळी जागा, तुपे बंगल्याशेजारी नीरा डावा कालव्यालगत, सुदीत हॉटेलसमोर अंबिकानगर, रिमांड होम नटराज नाट्यमंदीर या दरम्यान सेवा रस्त्यावर, तसेच सांस्कृतिक केंद्रासमोर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकरी किंवा भाविकांना काही अडचण आल्यास राजेंद्र सोनावणे ९४२१०५४३३३, अजय लालबिगे ९४२१८७८९४१, सुभाष नारखेडे ९०११६८५४६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शौचालयांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली कोणाही उघड्यावर शौचास जाऊ नये असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.