मुंबई : महान्यूज लाईव्ह
फेसबुक लाईव्ह करून आमदारांच्या बंडामुळे व्यथित झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानावरून आपला मुक्काम मातोश्रीकडे हलवला, मात्र त्याच दिवशी ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते. परंतु शरद पवार यांनी त्यांना रोखले. याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. एवढेच नाही तर आजही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते..!
शिवसेनेचे झालेल्या तिसऱ्या बंडामुळे सध्या उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवार व्यथित आहे. या मानसिकतेतूनच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊ केला होता, मात्र याची थोडीशी कुणकुण लागल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह हे नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाले होते, अशी माहिती इंडिया टुडे च्या हवाल्याने दिली जात आहे.
दरम्यान आज देखील उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राजीनामा देण्याची मानसिकता केली होती, मात्र गृहमंत्री वळसे पाटील हे शरद पवार यांचा निरोप घेऊन पोहोचले आणि त्यांनी राजीनामा दिला नाही. शरद पवार यांनी रोखल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला जाणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.