मुंबई : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना ची लागण झाली आहे. आज त्यांनी स्वतः करून ही माहिती दिली असून, आपल्या संपर्कातील इतरांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
अजितदादांनी या संदर्भात स्वतः माहिती दिली. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मी काल कोरोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, माझी प्रकृती उत्तम आहे. मी डॉक्टरांचा सध्या सल्ला घेऊन विश्रांती घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या इतरांनीही कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान सध्याच्या राजकीय धावपळीत रुग्ण संख्या वाढत असल्याने आणि यामध्ये प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याने मुंबईत कोरोना चा प्रसार वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.