बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व कथालेखक प्रा. विजय काकडे यांना ठाण्याच्या गोकुळ बालसंस्कार संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कॉम्रेड बाबा अरगडे, कवी गीतकार गुलाबराजा फुलमाळी यांच्या हस्ते औरंगाबाद येथील सिडको-१ प्रगतीनगर येथे २६ जून रोजी झालेल्या कवी संमेलनात प्रदान करण्यात आला. औरंगाबाद येथे षटकोळी साहित्यप्रेमी विचारमंच समूह व सोहम पब्लिकेशन, यांच्या वतीने या एक दिवसीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार बाबासाहेब मंडलिक, ग्रामीण कवी शहादेव सुरसे, नितिन गायके, संध्याराणी कोल्हे, कांचन ठाकूर, संतोष साखरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रा. विजय काकडे यांचे आतापर्यंत चार कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यासोबतच अनेक वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून कथा, कविता, गझल इत्यादी लेखन केले आहे.
प्रा.काकडे यांच्या वरील कार्याची दखल घेऊन गोकुळ बाल संस्कार संस्थेच्या वतीने त्यांना हा बहुमान देण्यात आला. प्रा. काकडे यांच्या वा यशाबद्दल संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, शिक्षकांनी अभिनंदन केले.