बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्यसेवा व केंद्रीय परीक्षेत आपला झेंडा रोवला. श्रेया बंडगर हिची केंद्रीय परिक्षेद्वारे सहाय्यक शाखा पोस्टमास्तर पदी व शिवाजी पाणगे यांची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली.
या दोघांनी महाविद्यालयातील अभ्यासिकेत अभ्यास करून यशाला गवसणी घातली. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात स्पर्धा परिक्षेत यावर्षी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून जवळपास ३० विद्यार्थी पोलिस उपनिरीक्षक, आरटीओ, पोस्टमास्तर, वनअधिकारी, पोलिस शिपाई इ. पदावर नियुक्त झाले आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली.
यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्या प्रतिष्ठानमधील स्वच्छ व सुंदर परिसर तसेच येथील निरव शांतता वाखाणण्यासारखी आहे. येथील सुसज्ज असे ग्रंथालय, वाचन कक्ष व भव्य क्रीडांगण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यी राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होत आहेत असे नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षा समिती व ग्रंथालय समितीतील सदस्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यी कसे यशस्वी होतील यास प्राधान्य दिले आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात व कोरोना काळात राज्यसेवा परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून इतर विद्यार्थ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे गौरवोद्गार सौ. सुनेत्रा पवार यांनी काढले.
संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व स्पर्धा परीक्षा समितीतील सदस्यांचे अभिनंदन केले.
Shreya bandgar यांची केंद्र सरकारी नोकरी असुन त्यानी राज्य सेवा परिक्षा दिली नाही , ही बातमी अपडेट करावी, अशी विनंती
Shreya Bandgar यांनी राज्य सेवा परिक्षा दिल्ली नाही, त्यांची केंद्र सरकारी नोकरी आहे….