संदीप मापारी पाटील
बुलढाणा : महान्यूज लाईव्ह
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खामगाव -पंढरपूर स्पेशल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खामगाव -पंढरपूर आषाढी एक्स्प्रेस स्पेशल चा समावेश असून हि गाडी खामगाव -पंढरपूर स्पेशल – गाडी क्र. ०११२१ दि. ७ व १० जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगाव येथून रवाना होऊन दुपारी १.२५ वाजता भुसावळ तर दुसर्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपुर पोहचणार आहे.
याशिवाय नागपूर -पंढरपूर, नागपूर-मिरज, मिरज-पंढरपूर आणि नागपूर-पंढरपूर या गाड्यांचा समावेश आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. तसेच, विठुरायाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.